Asaduddin Owaisi Rally in Mumbai: असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेबाबत अनिश्चितता कायम; इम्तियाज जलील म्हणाले 'राष्ट्रवादीला MIM चा धोका असल्यानेच नाकारली परवानगी'
Asaduddin Owaisi | (Photo Credits: Facebook)

एमआयएमचे (AIMIM ) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या मुंबईत होणाऱ्या सभेबाबत जोरदार चर्चा आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police ) मात्र असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेला (Asaduddin Owaisi Rally in Mumbai) परवानगी नाकारली आहे. मुंबईत वाढत असलेल्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या धोक्याबाबत असलेल्या जमावबंदी आदेशाचे कारण दाखवत पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारली आहे. दरम्यान, एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथून एक रॅली मुंबईला निघाली आहे. त्यामुळे मुंबईत आज नेमके काय होणार याबाबत उत्सुकता लागली आहे. तसेच, असदुद्दीन ओवैसी यांची सभा मुंबईत होणार की नाही याबाबतही संभ्रम आहे. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil)यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता, वळसे पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.

प्रसारमाध्यमांनी संबंधित रॅली आणि सभेबाबत विचारले असता गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले की, मुंबईत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांनी हा आदेश लागू केला आहे. मुंबईत ओमायक्रॉनचा धोका वाढत आहे. कायदा-सुव्यवस्थेच्या संदर्भात काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे काही गोष्टींचा विचार करुन काही गोष्टी टाळायला हव्यात. मात्र, त्याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर होईल, मुंबई पोलीस आयुक्तांचा निर्णय अंतिम असेल', असेही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. (हेही वाचा, मुंबईत येत्या 12 डिसेंबर पर्यंत रॅली, मोर्चे-आंदोलन करण्यास बंदी, पोलिसांकडून कलम 144 लागू)

दरम्यान, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोप की, मुंबईत एमआयएमकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धोका आह. म्हणूनच औवैसी यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात येत आहे. मुंबई पोलिसांवर राजकीय दबाव आहे. त्यामुळे मुंबई पोलिसही आमची रॅली आढविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दिसते. आम्ही भारतीय नागरिक आहोत. आम्हाला मुंबईत जाण्याचा अधिकार आहे. काहीही झाले तरी आम्ही मुंबईत जाणारच, असेही इम्जियाज जलील यांनी म्हटले आहे.

इम्तिजाय जलील यांच्या आरोपाबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारले असता, जलील यांचा दावा फेटाळून लावत ते म्हणाले, हा आरोप अत्यंत चुकीचा आहे. केवळ एखाद्या पक्षाला धोका आहे म्हणून विरोध केला जातो आहे हे म्हणने सारासार चूक आहे. पोलीस त्यांच्या कर्तव्यावर ठाम आहेत. ते त्यांचे कर्तव्य बजावत असतात, असेही दिलीप वळसे-पाटील म्हणाले.