भाजपच्या (BJP) निलंबीत प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेषित पैगंबर यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्या अटकेची जोरदार मागणी होऊ लागली आहे. सोलापूर येथे एमआयएमच्या (AIMIM ) नेतृत्वाखाली एक भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. औरंगाबाद येथेही जोरदार निदर्शने केली जात आहेत. नुपूर शर्मा यांच्यावर केवळ पक्षांतर्ग कारवाई न करता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे. नुपूर शर्मा यांच्या अटकेसाठी मुस्लिम समूदयाने बंदचे अवाहन केले जात आहे. नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे देशभरात त्यांच्यावर विविध ठिकाणी 50 हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत.
नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही कार्यक्रमात बोलताना प्रेषित महम्मद यांच्याबद्दल जे वक्तव्य केले त्याचा तीव्र निषेध मुस्लिम संघटनांनी केला आहे. जगभरातीलही अनेक मुस्लिम देशांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याच मुद्द्यावरुन एमआयएमने सोलापूरमध्ये भव्य मोर्चा काढला होता. सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मुस्लिम धर्मियांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. नुपूर शर्मा यांना अटक करा अशी या समूहाची मागणी आहे. (हेही वाचा, Nupur Sharma: भाजपमधून निलंबित नुपूर शर्मा यांनी यांची प्रतिक्रिया, पक्षाने दिलेल्या निर्णयाचा करते आदर)
दरम्यान, अहमदनगर येथेही बंदची हाक देण्यात आलीआहे. मुस्लिम समुदयाने नुपूर शर्मा यांना अटक करा अशी मागणी करत अहमदनगर येथे मोठ्या प्रमाणावर बंद पाळला.