अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील श्रीरामपूर पोलीस ठाण्यात (Shrirampur Police Station) दाखल झालेल्या एका गुन्ह्याच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना एका वयवर्षे केवळ 11 असलेल्या एका अल्पवयीन मुलासोबत झालेल्या सामूहिक लैंगिक अत्याचार (Unnatural Sexual Assault) प्रकरणाची आहे. ज्यामध्ये जवळपास 9 जणांनी कथीतरित्या या मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार (Unnatural Sex) केले. पीडिताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, नऊ जणांचा संशयीत आरोपी म्हणून समावेश आहे.
अहमदनगर जिल्ह्यात खळबळ
श्रीरामपूर शहरातील या प्रकरणाने केवळ शहरच नव्हे तर अहमदनगर जिल्ह्यातही खळबळ उडाली आहे. आरोपींचे वय समजू शकले नाही. मात्र, त्यांची संख्या नऊ इतकी आहे. या सर्वांनी मिळून या मुलासोबत अमानवी कृत्य केले. आरोपींनी कथीतरित्या पीडितास धमकावले आणि अनैसर्गिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केले. आरोपींनी पीडितावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्यांनंतर त्याने घडला प्रकार कोठे सांगू नये. त्याची वाच्यता करु नये यासाठी त्यास धमकावले आणित्याच्यावर दबावही टाकला. (हेही वाचा, Unnatural Sex, Husband-Wife and HC: पत्नीच्या संमतीशिवाय ठेवलेले अनैसर्गिक शारीरिक संबंध बलात्कार नव्हे; Marital Rape बाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय)
श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल
अनैसर्गिक लैंगिक अत्याचार झाल्याने होत असलेला त्रास असह्य झाल्याने पीडिताने आपल्या आईस याबाबत माहिती दिली. घडला प्रकार समजताच आईस मोठा धक्का बसला. आईने मुलास धीर दिला आणि तातडीने श्रीरामपूर पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी पीडिताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यातील काही आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. हे बाल संरक्षण कायदा आणि बालहक्कांशी संबंधीत प्रकरण असल्याने पोलीस अधिक सखोलपणे या प्रकरणाचा अभ्यास करत आहेत. प्रकरणाचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (हेही वाचा, Pune Horror: पाच वर्षांच्या मुलासोबत अनैसर्गिक कृत्य; आरोपीस अटक, राजगुरुनगर परिसरातील घटना)
बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर या शाळेत नुकत्याच दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार घडल्याची कथीत घटना पुढे आली. या घटनेनंतर जनमानसात तीव्र प्रतिक्रिया उमटली. नागरिक जमावाने एकत्र आले. त्यांनी अंबरनाथ रेल्वेस्टेशन गाठून रेल्वे वाहतूक जवळपास चार तास रोखून धरली. त्यानंतर पोलीस यंत्रणा आणि राज्य सरकारवरील दबाव वाढला. त्यामुळे आरोपी अक्षय शिंदे यास ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, अक्षय शिंदे हा या प्रकरणाचा तपास पूर्ण होण्याआधीच पोलीस चकमकीत मारला गेला. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले. दरम्यान, शाळेच्या संचालकांनाही अटक झाली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना जामीन मिळाला. या प्रकरणामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा बालकांच्या लैंगिक सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. श्रीरामपूर येथेही अशीच घटना घडल्याचे पुढे आले आहे.