पुणे (Pune) जिल्ह्यातील राजगुरुनगर (Rajgurunagar) येथील परिसरात पाच वर्षांच्या एका मुलासोबत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार (Unnatural Sexual Offence) कक्षेत मोडणारे वर्तन घडले आहे. खेड पोलिसांनी (Khed Police Station) या प्रकरणी एका आरोपीस अटक केली आहे. विजय बाळू ताठोड असे त्याचे नाव आहे. पीडिताच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन त्याच्यावर बाल लैगिंक अत्याचार अधिनियम (Children from Sexual Offences Act) 2012 कलम 4,6,8,12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 22 सप्टेंबर रोजी घडल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सदर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्मण झाली आहे.
खेड पोलीस दप्तरी गुन्हा दाखल
पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर शहरात माळीमळा येथे घुमटकर चाळ आवारात तक्रारदाराचा मुलगा अंगणात खेळत होता. याच वेळी बाळू ताठोड नामक व्यक्ती तिथे आला. त्याने या मुलास 'चल तुला खाऊ देतो' असे सांगितले. ज्या आमिशाने हा मुलगा त्याच्यासोबत जाण्यास प्रवृत्त झाला. दरम्यान, बाळू याने त्याच्यावर कथितरित्या जबरी अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. ज्यामुळे मुलगा वेदनेने कळवळला. त्याला त्रास होऊ लागल्याने पालकांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक प्रकार पुढे आला. त्यामुळे पालकांनी खेड पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीस अटक केली आहे. त्याच्याकडे पुढील चौकशी सुरु आहे. चौकशीमध्ये अनेक बाबी पुढे येण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Pune: वयाच्या 86 व्या वर्षी लग्न करण्याची वडिलांना इच्छा, मॅरेज ब्युरोत नावही नोंदवले; मुलाकडून हत्या)
बालकांवरील लैंगिक अत्याचारांविरोधात मदत: टोल फ्री क्रमांक
लहान मुलांची सुरक्षा हा सध्या कळीचा मुद्दा बनला आहे. विविध शहरे, गावे आणि ठिकाणांहून बाललैंगिक अत्याचाराच्या घटना पुढे येत आहे. बालकांवर होणारे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार नेहमीच सतर्क असते. त्यासाठी विविध कायदे आणियंत्रणाही कार्यन्वित केलेली असते. तरिसुद्धा अशा घटना घडतात याबाबत समाजातून चिंता व्यक्त होत आहे. अशा घटना टाळण्यासाठी सरकारने आपत्कालीन स्थितीत तातडीची मदत देण्यासाठी टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. कोणत्याही बालकावर लैंगिक अत्याचार झाल्यास अथवा तशी परिस्थिती उद्भवल्यास पीडित किंवा त्यांचे पालक अथवा कोणताही नागरिक 1098 किंवा 112 या क्रमांकावर संपर्क साधून मदत मागू शकतात. महत्त्वाचे म्हणजे हे फोन क्रमांक टोल फ्री आहेत आणि तातडीची मदत या कक्षेत येतात. (हेही वाचा, Unnatural Sex, Husband-Wife and HC: पत्नीच्या संमतीशिवाय ठेवलेले अनैसर्गिक शारीरिक संबंध बलात्कार नव्हे; Marital Rape बाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय)
दरम्यान, बदलापूर येथील एका शाळेत अलिकडेच लहान मुलींसोबत लैंगिक अत्याचाराची घटना घडली. ज्यामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला. या घटनेनंतर बालकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचा मुद्दा अधिक ऐरणवीर आला. त्यामुळे राज्य सरकारने