Ahmednagar News: मंदिरातून चोरले 40 किलो वजनाचे सिंहासन,अहमदनगर येथील घटना
Thief | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Ahmednagar News:  अहमदनगर श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक  येथील श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिरात सोमवारी मध्यरात्री चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारासा दोन अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. श्री सुद्रिकेश्वर महाराजांचे 40 किलो वजनाचे चांदीचे सिंहासन चोरले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे. (हेही वाचा- विधवा महिलेच्या घरातून नोकरांने पळवले 50 लाख रुपयांचे दागिने)

मिळालेल्या माहितीनुसार, चोरी झालेल्या सिंहसानाची किंमत जवळपास 30 लाख रुपयांची असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी सकाळी घटनेची मिळताच गावकऱ्यांनी निषेध केला. गावकऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपाधीक्षक विवेकानंग वाखारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिनेश आहेर, पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर भोसले, पोलिस उपनिरिक्षक समीर अभंग यांनी घटनास्थळी भेट दिली.

या घटनेनंतर गावकऱ्यांनी तीव्र संतापाची लाट उसळली आहे, सीसीटीव्ही कॅमेरात घटना कैद झाली. सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास दोन चोरटे मंदिरासमोर आले. मंदिराचे कुलुप तोडले आणि मंदिराच्या आत प्रवेश करून सिंहासनाची चोरी केली. मंदिरात सकाळी मंदिराचे पुजारी रमेश धुमाळ आले. घडलेली घटना गावकऱ्यांना सांगितली.  या घटनेनंतर गावाकऱ्यांनी संताप व्यक्त केले. चोरट्यांना लवकरात लवकर पकडावे आणि कडक कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.