Mumbai Crime: विधवा महिलेच्या घरातून नोकरांने पळवले 50 लाख रुपयांचे दागिने, खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Gold | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Mumbai Crime: मुंबईतील खार पश्चिम येथे एका ज्वेलर्स असलेल्या विधवा महिलेच्या घरातून 50 लाख रुपयांचे दागिने चोरल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुनीत झवेरी असा पीडित महिलेचे नाव आहे. पीडित महिलेने खार पोलिस स्टेशनमध्ये तिच्या घरी असलेल्या नोकरांविरुध्दात गुन्हा दाखल केला आहे. सुनीचा तिच्या 19 वर्षीय मुलीसोबत घरात राहत होती. राजा यादव उर्फ ​​निरज (19) आणि शत्रुघ्न कुमार उर्फ ​​राजू (19) असं आरोपींचे नाव आहे. गेल्या महिन्यांपासून दोघे नोकर कामाला होते अशी माहिती सुनीताने दिली. (हेही वाचा-  कोल्हापुरात 50 हजारांच्या टोमॅटोची चोरी,)

सुनीताने दिलेल्या तक्रारीनुसार, घरातून 50 लाख रुपयांचे दागिने घरातून चोरले. शनिवारच्या रात्री  नोकरांने जेवणात विष घातले होते ज्यामुळे मला आणि मुलीला उलट्या झाल्या त्यानंतर 11च्या सुमारास आम्ही झोपी गेलो. गुंगी चढल्यामुळे थेट रविवारी 9च्या सुमारास उटली. सकाळी उटल्यावर पाहिलं तर घरात संपुर्ण उथलपाथल केली होती. स्वयंपाकघरात गेले तेव्हा दोन्ही नोकर तेथे नव्हते. त्यामुळे सुनीलाला दोघांवर संशय आला. परंतु त्या दोघांनाही उलट्या काही थांबेना, त्यामुळे तीनं या घटनेची माहिती तिच्या मुलाला दिली.

मुलाने दोघांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केले. तेथे दोघीवर उपचार सुरु केले. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी राजा यादव उर्फ ​​निरज (19) आणि शत्रुघ्न कुमार उर्फ ​​राजू (19) वर भारतीय दंड संहिताच्या कलम 328, (विषाद्वारे दुखापत करणे), 381 (नोकराकडून चोरी) आणि 34 (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणिपोलिस त्यांचा शोध घेत आहेत.