अहमदनगर: तब्बल दीड लाखांचे दागिने घेऊन एका नववधूने प्रियकरासोबत ठोकली धूम; पतीच्या तक्रारीनंतर श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

लग्नानंतर अवध्या 15 दिवसांतच नववधूने आपल्या पतीसह सासरच्या मंडळींना नवरंग दाखवले आहेत. तब्बल दीड लाखाचे दागिने घेऊन एका नववधूने आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. ही अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी पहिल्या पतीने दिलेल्या तक्रारीवरुन पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुणी प्रियकरासोबत आळंदीला पळाली असून तिथे जाऊन त्या दोघांनी लग्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

फिर्यादी हा अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी येथील रहवाशी आहे. तसेच त्याचे लग्न बारामती तालुक्यात राहणाऱ्या एका तरूणीशी 25 जून रोजी विवाह झाला होता. मात्र, 11 जून रोजी पतीच्या घरातून एक लाख 55 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन ती पळून गेली आहे. ही विचित्र घटना आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. तसेच लग्नापूर्वीच तिचे तरडोली गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे बोलले जात आहे. हे देखील वाचा- मुंबई: प्रवासासाठी खोटे E-Passes बनवणाऱ्या चार जणांना गुन्हे शाखेकडून अटक

मुली घर सोडून प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न का करतात, याचे कारण एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. मुंबई, दिल्ली आणि जयपूरमधील 15 ते 20 वयोगटातील 15 मुलींसंबंधी एक सर्व्हे करण्यात आला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, संधीची कमतरता आणि किशोरवयात लैंगिक संबंधांना कलंक मानणे आदी कारणे या सर्वेक्षणातून समोर आली आहेत. बहुतांश पालक आपल्या मुलांकडे लक्ष देत नाहीत, हे एक महत्वाचे कारण अहवालात दिले आहे.