महाराष्ट्रात शिवसेनेला कॉंग्रेस मदत करण्याबाबत निर्णय अजूनही गुलदस्त्यात; सोनिया गांधींसोबत केवळ राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली: बाळासाहेब थोरात
Congress Leaders | Photo Credits: Twitter

महाराष्ट्रात 24 ऑक्टोबर दिवशी विधानसभा मतदानाचा निर्णय लागला मात्र अद्याप राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. आज महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांनी दिल्लीमध्ये हंगामी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Congress Interim President Sonia Gandhi) यांची भेट घेतली. तासभर भेट झाल्यानंतर कॉंग्रेस नेत्यांनी ही भेट केवळ राजकीय परिस्थिती, मताविभाजन आणि निकाल याबाबत असल्याची माहिती दिली आहे. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे आदी कॉंग्रेस नेते आज दिल्ली दरबारी सोनिया गांधींच्या भेटीला गेले होते. बैठक पार पडल्यानंतर महाराष्ट्र कॉग़्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सत्ता स्थापनेबाबत तसेच शिवसेनेला मदत करण्याबाबत चर्चेविषयी बोलणं कटाक्षाने टाळलं आहे. शिवसेनेच्या संजय राऊत यांच्याकडून इंदिरा गांधींच्या शिकवणीचा मंत्र रिट्वीट! महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा संघर्ष शिगेला असताना दिले 'खास संकेत'?

भाजपा, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना यांनी आपला विधीमंडळ नेता निवडला आहे. पण कॉंग्रेस पक्षाकडून अद्याप त्यांच्या विधीमंडळ नेत्याची निवडा होणं बाकी आहे. त्यामुळे कॉंग्रेसकडून कोणाचे नावं पुढे केले जाणार? याबाबतही चर्चा रंगल्या आहेत. मतदारांनी राज्यात महायुतीला कौल दिला असला तरीही सत्ता वाटपावरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये संघर्ष सुरू असल्याने इतर राजकीय पक्षांसोबत जाऊन सेना सत्ता स्थापन करणार का? भाजपं नवी राजकीय खेळी रचणार? अशा उलट सुलट चर्चांना सध्या ऊत आला आहे. मात्र कॉंग्रेसने अजूनही सत्तेच्या राजकारणाबाबत आपली भूमिका गुलदस्त्यामध्ये ठेवली आहे.

ANI Tweet

महाराष्ट्रात 288 विधानसभा जागांवर मतदान घेण्यात आले. राष्ट्रवादी आणि इतर घटक पक्षांसोबत कॉंग्रेसने आघाडी करत निवडणूकांचा सामना केला. पण मतदान निकालात कॉंग्रेसच्या वाट्याला 44 जागा मिळाल्या आहेत.