पुणे (Pune) येथील सिंहगड पोलीस स्टेशन (Sinhagad Police Statio) हद्दीतील धायरी परिसरातून अतिशय धक्कादायक घटना पुढे येत आहे. केवळ अंधश्रद्धेतून (Superstition ) सासरच्या मंडीळींनी सुनेसोबत (Aghori Magic With Daughter-In-Law) अघोरी कृत्य केले आहे. पीडितेने सासरच्या त्रासाला कंटाळून पोलिसांत तक्रार दिल्यानंतर या धक्कादायक प्रकाराचा भांडाफोड झाला. घरातील लोक अघोरी पुजा करत असतात. ते आपणास स्मशानात घेऊन जातात. तिथूनत प्रेतांची राख (Ashes of Corpses) आणि हाडांची भुकटी (Bone Powder) घरी आणून ती पाण्यात मिसळून आपल्याला प्यायला देतात, असा धक्कादायक दावा पीडितेने तक्रारीत केला आहे.
घराला बरकत येत नाही, मूल होत नाही आदी कारणांवरुन पीडितेवर सासरचे कुटुंबीय पूजा करत असत. आमावस्येला काळे कपडे घालून पीडितेची पूजा केली जात असे. तू लग्न करुन घरात आल्यापासून घरातील लक्ष्मी निघून गेली. असे सांगत सासरचे लोक सातत्याने मानसिक आणि शारीरिक त्रास देत असत. प्रत्येक आमावस्याला प्रेतांची राख आणि हाडांची भूकटी पाण्यातून देणे सातत्याने सुरुच होते असे सांगतानाच सन 2019 पासून सलग चार वर्षे हा अघोरी प्रकार आपल्यासोबत सुरुच असल्याची माहिती पीडितेने तक्रारीत दिली आहे. सारसचा त्रास सहन करण्यापलीकडे गेल्याने पीडितेने माहेरच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर सिंहगड पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आल्याचे पीडितेने म्हटले आहे. (हेही वाचा, मुलींच्या फोटोंवर हळद-कुंकू, टाचण्या टोचलेले लिंबू; वशीकरण, करणीच्या नावाखाली कोल्हापूरमध्ये अघोरी प्रकार)
पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन सिंहगड पोलिसांनी नरबळी आणि अमानूष अघोरी प्रथा, जादूटोणा कायद्यानुसार सासरच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केली आहे. जयेश पोकळे, श्रेयश पोकळे (दीर), इशा पोकळे (जाऊ), कृष्णा पोकळे (सासरे), प्रभावती पोकळे (सासू) आणि दीपक जाधव, बबीता जाधव यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे.