Black Magic | (File Photo)

पुरोगामी वसा आणि वारसा लाभलेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) कोल्हापूर जिल्ह्यात काळी जादू (Kolhapur Black Magic) सुरु असल्याची अतिशय धक्कादाय घटना पुढे येत आहे. वशीकरण (Vashikaran आणि करणी (Karni Badha) करण्याच्या नावाखाली जिल्ह्यातील पाडळी खुर्द (Padali Khurd Village) गावच्या हद्दीत अनेक मुलींच्या फोटोंवर हळद-कुंकू, टाचण्या टोचलेलेल लिंबू, त्यावर हिरवे कापड आणि इतर साहित्य आढळून आले आहे. घडल्या प्रकारामुळे गावातील मुलींमध्ये भीतीचे आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गावातील अनेक पालक तर मुलींना शाळेत पाठवावे की नाही याबाबत विचार करत असल्याचे समजते.

कोल्हापूर हा पुरोगामी आणि सांस्कृतीक वारसा लाभलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. कोल्हापूर जिल्ह्यातून समाजपरीवर्तनाची अनेक आंदोलने, चळवळी आणि संस्था उभ्या राहिल्या. त्यामुळे अशा जिल्ह्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली अशी विचित्र घटना पाहायला मिळावी याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. घडल्या प्रकाराची गावकऱ्यांमध्ये इतकी दहशत आहे की, रात्रभर गस्त घालावा असा गावकऱ्यांचा विचार आहे. काही गावकऱ्यांनी तर ग्रामपंचायतद्वारे गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जावेत अशीही मागणी केली आहे. गावकरी सीसीटीव्ही बसवण्यावरही विचार करत आहेत. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, Kerala ‘Black Magic’ Case: काळ्या जादूच्या नावाखाली, पीडिताच्या शरीराचे 56 तुकडे; शरीराचे काही भाग शिजवून खाल्ले, केरळ राज्यातील धक्कादायक घटना)

घडल्या प्रकाराबद्दल गावकऱ्यांनी पोलिसांमध्ये तक्रार देणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, अद्याप तरी पोलिसात तक्रार झाल्याचे वृत्त नाही. गावच्या लेकीबाळींचे घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. प्रशासनाने तरी दखल घेऊन याबाबत योग्य ती पावले टाकावीत आणि गावकऱ्यांना चिंतामुक्त करावे. हे असेच सुरु राहिल्यास गावकऱ्यांवर मानसिकदृष्ट्या मोठे संकट येईल अशी भावना गावातील सुज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत.