Pub and Bar Entry rules: पुणे पोर्शे कार अपघातानंतर अल्पवयीन मुलांच्या(Minor) आणि तरूणांच्या दारु पिण्यावर शासनाने वचक बसवण्यासाठी कंबर कसली आहे. शासनाने कारवाई करण्यासाठी पुढाकार घेत कठोर नियमावली तयार केली आहे. ज्याचे कडेकोट पालन करणे आता बार चालकासह तरुणाईला गरजेचे ठरणार आहे. शासनाने पब(Pub)-बार(Bar) प्रवेशासाठीचे वयाबाबतचे नियम कठोर केले आहेत. ज्यात वाईन-बिअर पिण्यासाठी 21 वर्ष वय तर दारु पिण्यासाठी 25 वर्ष वय असणे बंधनकारक असणार आहे. बार-पब मालकांनी ओळखपत्र(Pub and Bar Entry rule) दाखवल्याशिवाय ग्राहकांना दारु न देण्याचा कडक इशारा देण्यात आला आहे. (हेही वाचा:Pune Pub and Bar Employees Protest: पुण्यामध्ये पब आणि बार कर्मचार्यांचे प्रशासनाच्या बुलडोझर कारवाई विरूद्ध आंदोलन )
पुणे कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलाने पोर्शे कार चालवत दोघांना उडवले होते. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणात नंतर मोठ्या घडामोडी घडल्या. अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले. या अपघातानंतर बार-पबमध्ये तरुणांच्या आणि अल्पवयीन मुलांच्या प्रवेशावर वयाचा पुरावा दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे संबंधित व्यक्तीला त्याचे खरे ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. शासनाच्या या नियमाची अंमलबजावणी करण्यास मुंबई-पुण्यात सुरुवात झाली आहे.
परवाना शुल्क किती?
एक दिवस -5 रुपये
एक वर्ष -100 रुपये
आजीवन -1000 रुपये
काय आहे शिक्षेची तरतूद?
परवाना नसलेल्या व्यक्तीस मद्यविक्री करणे हाही गुन्हा मानला जातो. त्यासाठी 25 हजार ते 30 हजार रुपये दंडाची तरतूद आहे. यासाठी 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा 10,000 रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. दुसऱ्यांदा हा गुन्हा घडल्यास ही शिक्षा 2 वर्षे तुरुंगवास आणि 25 ते 30 हजार दंड अशी कायद्यात शिक्षेची तरतूद आहे.