Jan Samvad Yatra: जालना जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर राज्यात वाढलेल्या तणावामुळे महाराष्ट्र काँग्रेसने (Maharashtra Congress) रविवारपासून मराठवाड्यातील (Marathwada) सर्व जिल्ह्यांमध्ये नियोजित केलेली 'जनसंवाद यात्रा' (Jan Samvad Yatra) तात्पुरती स्थगित केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दिलेल्या निवेदनात यात्रा स्थगित करण्याची घोषणा केली आहे. यात्रेच्या नवीन तारखा पुढील काळात जाहीर केल्या जातील असेही त्यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, धुळे-सोलापूर मार्गावरील अंतरवली सारथी येथे हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्याचा अवलंब केला. परिणामी जालन्यात अशांतता पसरली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालन्यातील नागरिक आंदोलन करत होते. या चकमकीत सुमारे 40 पोलीस कर्मचारी आणि अनेक आंदोलक जखमी झाले. हिंसाचारात अनेक बसेसही जाळण्यात आल्या. या घटनांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून 350 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा -Jalna Violence: जालन्यातील हिंसाचाराचे मुंबईत पडसाद! ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे मुंबईतील मरीन ड्राइव्हवर आंदोलन, Watch Video)
तथापी, गेल्या महिन्यात, महाराष्ट्र काँग्रेसने 3 ते 12 सप्टेंबर या कालावधीत 'जनसंवाद यात्रे'च्या योजनांची सुरूवात केली होती. प्रदेश काँग्रेसचे प्रमुख नाना पटोले यांनी यात्रेदरम्यान तालुका, गाव आणि शहरासह विविध स्तरांवर सरकारचे अपयश अधोरेखित करण्यासाठी आणि विरोधी आघाडीचा संदेश देण्यासाठी पक्षाचे नेते प्रवास करतील, असं सांगितलं होतं.
नाना पटोले पूर्व विदर्भात यात्रेचे नेतृत्व करणार होते, तर राज्य विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुरात मोर्चात सहभागी होणार होते.