पदाचा राजिनामा देवून भाजपला रामराम ठोकणार असल्याची घोषणा भाजपचे आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर अनिल गोटेंनी आपला राजिनामा मागे घेतला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत सुमारे सव्वातीन तास झालेल्या चर्चेत दोन अटी मान्य केल्यामुळे राजिनामा मागे घेत असल्याचे अनिल गोटेंनी सांगितले. अनिल गोटे यांचा आमदारकी राजीनाम्यासोबतच भाजपाला रामराम
गुन्हेगारांना पक्षात प्रवेश द्यायचा नाही आणि धुळे महापालिका निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली लढल्या जाव्यात या दोन अटींवर गोटेंनी राजिनामा मागे घेतला आहे. यावेळी त्यांनी संरक्षणमंत्री सुभाष भामरे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले असून पक्षाने दगाफटका करण्याचा प्रयत्न केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
काँग्रेसप्रमाणे भाजपातही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार प्रवेश करत आहेत. त्यामुळे भाजपासह राजकारणालाही रामराम ठोकण्याचा गोटेंचा विचार होता. म्हणूनच गोटे 19 नोव्हेंबर 2018 रोजी महाराष्ट्र सदनात आमदारकीचा राजीनामा देणार होते.