anil gote

भाजपाचे विद्यमान आमदार अनिल गोटे यांनी राजकारणाला रामराम ठोकण्याची घोषणा केली आहे. भारतीय जनता पक्षाला एका पत्राच्या माध्यमातून अनिल गोटे यांनी त्यांचा निर्णय कळवला आहे. राजकारणात गुन्हेगारांचा होणारा वाढता प्रवेश पाहता राजकारणाला रामराम ठोकण्याचा निर्णय अनिल गोटे यांनी घेतला आहे.

काय आहे अनिल गोटे यांचे मत ?

कॉंग्रेस पक्षाप्रमाणेच भाजपामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीचे काही उमेदवार शिरकाव करत आहे. भाजपामध्ये होणारा हा शिरकाव अनिल गोटेंना खटकत आहे. त्यामुळे भाजपाप्रमाणेच अनिल गोटे यांनी राजकारणाला रामराम ठोकला आहे. महाराष्ट्र सदनात आमदारकीचा राजीनामा 19 नोव्हेंबर 2018 रोजी असल्याची माहितीदेखील अनिल गोटे यांनी दिली आहे.

अनिल गोटे हे भाजपापक्षातील जुन्या आणि अनुभवी आमदारांपैकी एक आहेत. सध्या धुळे मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. धुळे महानगरपालिकेमध्ये काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांचा समावेश करण्यात आला. त्यांच्या सहभागाला गोटे यांनी विरोध केला होता. मात्र त्यांचा विरोध न जुमानता काही उमेदवारांना प्रवेश देण्यात आल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.