MTDC आणि MOTOHOM च्या कॅम्परवॅनला पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून हिरवा कंदील; पर्यटकांसाठी प्रवासाची नवी सुविधा
MTDC आणि MOTOHOM च्या कॅम्परवॅनचे उद्घाटन (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (Maharashtra Tourism Development Corporation) यांनी सुरु केलेल्या MTDC आणि MOTOHOM च्या कॅम्परवॅनचे आज (6 सप्टेंबर) राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वलसा नायर सिंग (Valsa Nair Singh) आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील (Ashutosh Salil) उपस्थित होते. अशी माहिती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

स्वतंत्रपणे फिरण्याची आणि महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळांना भेट देऊन महाराष्ट्राचे सौंदर्य पाहण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही अतिशय उत्तम सोय आहे. उत्कृष्ट प्रवासाची सोय आणि पर्यटनस्थळी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी MTDC हे पाऊल उचलले आहे. (महाराष्ट्र पर्यटन विकास धोरणास मंजूरी; पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मानले मंत्रिमंडळाचे आभार)

आदित्य ठाकरे ट्विट:

महाराष्ट्रातील पर्यटनाला वाव मिळावा म्हणून कॅम्परवॅनची सेवा सुरु करण्यात आली असून महाविकास आघाडीचे सरकार आणि राज्य पर्यटन विभागातील सर्वच जण महाराष्ट्रातील पर्यटनाला जागतिक नकाशावर आणून जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.