Photo Credit- X

Adarsh School Badlapur Sexual Abuse Case: बदलापूरमधील नामांकित शाळ आदर्श हायस्कूलमध्ये (Adarsh School) दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार (Badlapur Sexual Abuse Case)प्रकरणाबाबत रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. अल्पवयीन मुलींचा अनेकवेळा लैंगीक छळ झाल्याचे उघड झाल्यानंतर आता शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर( Deepak Kesarkar) यांनी तपासात समोर आलेल्या महत्वाच्या माहितीचा खुलासा केला. आदर्श शाळेमध्ये 15 दिवसांचे सीसीटिव्ही रेकॉर्डिंग गायब असल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी पोलिस करत आहेत. (हेही वाचा: Adarsh School Badlapur Sexual Abuse Case: बदलापूर आदर्श शाळेत फॉरेन्सिक टीम आणि क्राईम ब्रँचची टीम दाखल; चौकशी सुरु)

शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी पुढे म्हटले की, 'घटना घडलेल्या शाळेमध्ये दोन सेविका होत्या. कामिनी वायकर, निर्मला भुरे अशी त्यांची नावे. ज्या लहान मुलांना वॉशरुमला जायचे असेल त्यांना या सेविका घेऊन जायच्या. या दोन्ही सेविका त्या मुलींना वॉशरूमला घेऊव जाताना जागवर नव्हत्या. शिवाय चौकशीवेळी ही त्या अनुपस्थित होत्या. त्यामुळे त्यांची चौकशी ही आता गृहखात्याकडून होईल. सगळ्यात मोठी चूक या दोन महिलांची आहे. त्या जर तिकडे असत्या तर हे प्रकरण घडलं नसतं. हे सगळ पाहता त्यांना सहआरोपी करावं,' असे ते म्हणाले. (हेही वाचा: Badlapur Sexual Assault Case: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावरुन महाविकासआघाडीची राज्यभर निदर्शने)

तसंच, 'मुलींच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी मी घेतली आहे. आम्ही फक्त काही मुद्दे समोर आणतोय. आम्ही यात चौकशी करु शकत नाही. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नेमली आहे. पोलिस चौकशी करणार आहेत. १५ दिवसाचं सीसीटिव्ही फुटेज गायब आहे. वॉशरुमजवळचा सीसीटिव्ही गायब आहे. शाळेच्या मॅनेजमेंटला सगळं माहिती असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल.' असे केसरकर यांनी म्हटले.