Urmila Matondkar | (Photo Credits: Facebook)

अभिनेत्री आणि काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेल्या उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट  (Instagram Account) हॅक झाले आहे. उर्मिला यांनी याबाबतचे ट्वीट करून माहिती दिली आहे. सुरूवातीला ते तुम्हांला डीएम करतात. काही स्टेप्स फॉलो करण्याच्या सूचना देतात, त्यानंतर ते हॅक होतं. खरंच? अशा शब्दांत त्यांनी ट्वीट केलं आहे. दरम्यान आज सकाळी महाविकास आघाडीमधील मंत्री सतेज पाटील यांचे ट्वीटर अकाऊंट देखील हॅक झाल्याची चर्चा आहे. त्यांच्या अकाऊंटवरून फोटो, ट्वीट्स गायब आहेत. आता त्यापाठोपाठ इंस्टाग्रामवर उर्मिला मातोंडकर यांचं अकाऊंट हॅक झाले आहे. गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचे ट्विटर अकाऊंट हॅक? सायबर सेलकडे तक्रार दाखल.

उर्मिला मातोंडकर यांचं नाव शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या 12 राज्यपाल निर्वाचित जागेसाठी पाठवण्यात आलं आहे. त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. पण शिवसेनेत पक्ष प्रवेश झाल्यापासून उर्मिला यांनी पक्षाच्या कामाला सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वी उर्मिला आणि कंगना रनौत यांच्यामध्ये ट्वीटर वर काही विषयावरून ट्विटर वॉर रंगलेलं पहायला मिळालं होतं. त्यानंतर केंद्र सरकारने संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द केलं त्यावरून उर्मिला यांनी टीकास्त्र डागत ‘राज्यात जेव्हा निवडणुका घेण्यात आल्या त्यावेळी मोठ्या सभा घेण्यात आल्या. म्हणजे संसद वगळता सर्व देश आता अनलॉक आहे. खूपच लोकशाही आहे. टू मच डेमोक्रॉसी असा हॅशटॅग यामध्ये होता.

उर्मिला मातोंडकर इंस्टाग्राम अकाऊंट हॅक

उर्मिला मातोंडकर इंस्टाग्राम अकाऊंट हॅक

उर्मिला मातोंडकर ट्वीट

लोकसभा निवडणूक 2019 च्या रणधुमाळीमध्ये उर्मिला यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांचा भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांच्याकडून पराभव झाला. त्यावेळेस स्थानिक कॉंग्रेस नेते आणि अंतर्गत गटबाजीमुळे आपला पराभव झाल्याचं सांगत त्यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकला होता. 1  डिसेंबरला त्यांचा 'मातोश्री' या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला. रश्मी ठाकरे  यांनी  त्यांच्या हातावर शिवबंधन बांधलं होतं.