गृहराज्यमंत्री, काँग्रेसचे (Congress) नेते सेज पाटील यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सतेज पाटील यांच्या ट्विटर अकाऊंट अचानक लॉक झाले आहे. इतकेच नव्हे तर सतेज पाटील यांच्या अकाऊंटवरचे सर्व ट्विट डिलिट झाले आहेत. सतेज पाटील फॉलो करत असलेल्या अकाऊंट्सची संख्याही शून्य दिसत आहे. हा प्रकार लक्षात येताच सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, आज साकळी ही बाब निदर्शनास आली. सतेज पाटील यांच्या ट्विटर अकाऊंटवरु त्याचे नाव गायब झालेले दिसले. तसेच, त्यांच्या अकाउंटवरुन करण्यात आलेली सर्व ट्वीट डिलीट झालेली दिसली. अकाऊंटवरुन सतेज पाटील यांचा फोटोही गायब झाला होता. सोबतच सतेज पाटील हे ज्या अकाऊंट्सना फॉलो करत असत ती अकाऊंटही प्रोफाईलवरुन गायब झालेली दिसली. त्यावरुन पाटील यांचे अकाऊंट हॅक झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येऊ लागला. त्यावरुन सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. (हेही वाचा, https://marathi.latestly.com/technology/2020-most-tweeted-emojis-tears-of-joy-to-praying-check-list-of-emoticons-released-by-twitter-india-201685.html)
दरम्यान, हॅकरकडून जर एखादे अकाऊंट हॅक झाले तर आजवरचा अनुभव असा की अकाउंटवर काहीतरी मेसेज दिसतो. परंतू, पाटील यांच्या अकाउंटवर कोणताही इतर मेसेज दिसत नव्हता. काही आक्षेपार्ह अथवा पाटील यांच्या मताशी विरोधात असे कोणतेही ट्विट करण्यात आले नव्हते. कोणालाही फॉलो अथवा कोणती पोस्ट शेअर, रिट्विट करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे नेमका प्रकार काय आहे हे लक्षात येत नव्हते.
दरम्यान, सतेज पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, माज्या ट्विटर अकाऊंटवरील सर्व ट्विट डिलीट झाली आहेत. तसेच, मी फॉलो करत असलेली अकाउंटही अनफॉलो केल्याचे पाहायला मिळत आहे. मी यासदर्भात सायबर सेलकडे तक्रार केली आहे.