Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Latur Accident News: लातूर जिल्ह्यातील औसा येथील पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याचा अपघाती निधन झाल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. युवराज दिलीप पांचाळ असं वाहन चालकाचे नाव आहे. औसा पोलिस ठाण्यातील कर्मचारी मोतीराम घुले आणि होमगार्ज धीरज मुंजाळ यांचा ही अपघात झाला परंतु सुदैवाने या दोघांचा जीव वाचला आहे. या घटनेनंतर पोलिस ठाण्यात शोककळा पसरली आहे. ( हेही वाचा- पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना दिलासा; ‘ऑनड्युटी’ असताना नैसर्गिक मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार 50 हजार रुपयांची मदत)

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी २६ फेब्रुवारी रोजी पोलिस ठाण्यातील कर्मचारी पेट्रोलिंगवर होते. दरम्यान गाडी अनियंत्रित झाल्याने त्यांच्या गाडीची महामार्गावर असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरला जोरदार धडक लागली. ही धडक इतकी भीषण होती की, या धडकेत गाडी चालक युवराज दिलीप पांचाळ हे गंभीर दुखापत झाली. आणखी दोन पोलिस कर्मचारी यांना गंभीर दुखापत झाली.

घटनेची माहिती पोलिस ठाण्यात देण्यात आली. अपघातस्थळी पोलिस दाखल झाले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी युवराज यांना मृत घोषित केले. युवराज यांच्या मृत्यूची माहिती कुटुंबियांना देण्यात आली. कुटुंबियांवर दुखाचे डोंगर कोसळले आहे. पोलिस ठाण्यातील या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.