Navale Bridge Accident | (Photo Credit - Twitter)

भीषण अपघात (Accident) घडून अवघे काही तासही उलटत नाहीत तोवर पुण्यातील नवले पूलावर (Navale Bridge Accident Pune) पुन्हा एकदा अपघात घडला आहे. रविवारी रात्री नवले पूलावर भीषण अपघात झाला होता. त्याची चर्चा सुरु असतानाच आज पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने निघालेला एक कंटेनर रस्तादुभाजकावर धडकला आणि अपघात घडला. त्यामुळे या पूलावर अपघाताचे सत्रच सुरु आहे का? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. नवले पुलावर अपघात होताच पुन्हा एकदा वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. प्रशासनाने अपघाताची कारने शोधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी या अपघातांनंतर वाढू लागली आहे.

प्राप्त माहितीनुसार, एक कंटेनर पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघाला होता. हा कंटेनर भरधव वेगात होता. दरम्यान, हा कंटेनर जाऊन दुभाजकावर धडकला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्रथमीक माहिती आहे. अपघाताची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचाव कार्य सुरु केले. तसेच, निर्माण झालेली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीही उपाययोजना केल्या. (हेही वाचा, Accident in Pune: पुणे येथील नवले पूल जवळ ट्रकचा ब्रेक फेल, भीषण अपघातात तीन ठार)

दरम्यान, याच ठिकाणी रविवारी एक भीषण अपघात झाला. या अपघातात एका ट्रकने 40 पेक्षाही अधिक वाहनांना धडक दिली. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने ही वाहने उभी होती. पाठिमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने या वाहनांना जोरदार धडक दिली. त्यानंतर चालकाने ट्रक उभा करुन घटनास्थळावरुन पोबारा केला. ही घटना रविवारी घडली. त्यानंतर लगेचच आज याच ठिकाणी दुसरा अपघात घडला.

व्हिडिओ

पुणे, मुंबई-बंगळुरू महामार्गावर असलेल्या नवले पूल परिसरात सातत्याने अपघात होतात. विशेष म्हणजे थोड्याफार फरकाने हे अपघात होण्याचा प्रकार सारखाच असतो. वारंवार होणाऱ्या अपघातांमध्ये साधर्म्य असल्याने अपघाताचे नेमके कारण काय? याबातब नागरिकांमध्येही चर्चा असते. दरम्यान, हे अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षेबाबत चर्चेसाठी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय अंतर्गत जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलवण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यानी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून केली आहे.