
Pune Accident: राज्यात दिवसेंदिवस अपघात वाढत चालली आहे. बुलढाणा बस अपघातामुळे महाराष्ट्रात अजूनही खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील पुणे शहरात पुन्हा अपघात घडून आल्याची माहिती समोर आली आहे. इनोव्हा कारला ट्रकने धडक दिल्याने हा अपघात घडून आला आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या कारचा अपघात झाला आहे. 5 जुलै बुधवारच्या दुपारी ही घटना घडून आल्याचे सुत्रांनी सांगितले. आबेंगाव तालुक्यातील एकलहरे गावात ट्रकची धडक कारला झाली.
सुदैवाने या अपघातात मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचा जीव वाचला. जास्त दुखापत न झाल्याचे सुत्रांकडून माहिती मिळाली आहे. या अपघातात इनोव्हा कारचे दोन्ही टायर फुटले. अपघात घडताच पोलीसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतला. पोलीस निरिक्षक सतिश होडगर यांनी आयुष प्रसाद यांच्या तब्येतीची विचारपुस केली.
वाहन चालक दीपक शिंदे यांनी बड्या चालाकीने ब्रेक लावत कारच्या मोठ्या अपघातातून वाचवले. पुणे नाशिक हायवेवर हा अपघात झाला. यात घटनेत गाडीचे नुकसान झाल्याचे दिसून आले. मंचर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद घेण्यात आली आहे.कारमध्ये आयुष प्रसाद यांच्या सोबत बॉडीगार्ड, आणि पोलीस हवालदार संजीव राजू पाटील हे देखील होते. या अपघातात कोणाचेही नुकसान झाले नाही अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.