Uday Samant, Sambhaji Raje Chhatrapati (PC - Facebook)

Uday Samant Accident: उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांचा आज मांडवा येथे अपघात झाला. स्‍पीडबोटीच्‍या (Speed Boat) कप्‍तानाचे बोटीवरील नियंत्रण सुटले त्यामुळे बोट खांबाला जावून धडकली. मात्र, सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. तसेच उदय सामंत यांच्यासह इतर नेते सुखरुप आहेत. त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

प्राप्त माहितीनुसार, आज अलिबागला एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी उदय सामंत, छत्रपती संभाजीराजे छत्रपती आणि इतर नेते बोटीने अलिबागला निघाले होते. याच दरम्यान, बोटच्या पार्किंगमध्ये बोट एका पिलरला धडकली. मात्र, बोटीच्या कप्तानने मोठ्या चालाखीने बोटीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. यापूर्वीदेखील उदय सामंत यांच्या बोटीला अपघात झाल्याची घटना घडली होती. (हेही वाचा - Ajit Pawar On PM: पंतप्रधानांच्या पदवीपेक्षा महागाई, बेरोजगारी आणि ढासळत चाललेले प्रश्न आहेत, अजित पवारांचे वक्तव्य)

दरम्यान, आज उदय सामंत अलिबागच्या दौऱ्यावर आहेत. अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शिवराज्यभिषेक सोहळा नियोजनासंदर्भातील बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी उदय सामंत आणि इतर नेते मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथून स्पीड बोटीने निघाले होते.मात्र, यावेळी स्पीड बोट खांबाला धडकली.

तथापी, रायगडावर 350 वा राज्‍याभिषेक सोहळा (पार पडणार आहे. यानिमित्ताने करण्यात येणाऱ्या नियोजनासंदर्भात आज पालकमंत्री उदय सामंत, आमदार महेंद्र दळवी, रायगड विकास प्राधिकरणाचे अध्‍यक्ष छत्रपती संभाजीराजे, कोकण आयुक्‍त डॉ. महेंद्र कल्‍याणकर यांच्‍या प्रमुख उपस्थितीत अलिबागच्‍या जिल्‍हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्‍यात आली.