Aarey Protest: आरे वृक्षतोडीवर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया; सत्तेत येताच 'आरे'च्या मारेकऱ्यांना अद्दल शिकवणार
Shiv Sena Party Chief Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook, File Photo)

आज  (5 ऑक्टोबर) सकाळपासून राजकीय, सामाजिक स्तरावरून आरे  (Aarey ) मधील वृक्षतोडीच्या प्रश्नांवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मुंबई मेट्रो (Mumbai Metro) आणि सरकारच्या निर्णयावर ताशेरे ओढले जात आहेत, भाजपाचा (BJP) मित्र पक्ष शिवसेनेने (Shivsena) सुद्धा सुरवातीपासूनच या वृक्ष तोड निर्णयाला विरोध केला होता, काल मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) निर्णयानंतर वृक्ष तोडीला हिरवा सिग्नल मिळताच आदित्य ठाकरे (Aaditya Thackrey) यांच्यासह अनेकांनी आपला रोष मांडला , अशातच आता शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey)  यांनी सुद्धा प्रतिक्रिया देत न्यायालयाच्या निर्णयावर अस्वस्थता व्यक्त केली आहे. तसेच येत्या काळात आमचे सरकार असणार आहे, आणि एकदा का सत्तेत आलो कि आरे च्या मारेकऱ्यांना शक्य तशी अद्दल घडणार आहोत असा दावा सुद्धा ठाकरे उद्धव यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी आरे मधील वृक्ष तोड हा शिवसेनेसाठी सुद्धा महत्वाचं मुद्दा असल्याचे म्हंटले आहे, आज जे काही घडतेय किंवा काल जे आहि घडून गेले आहे शिवाय भविष्यात जे घडणार आहे याचा अभ्यास करणे महत्वाचे आहे. याबाबत संपूर्ण सखोल माहिती प्राप्त करून परिस्थिती समजून मग आपण थेट विषयाला हात घालणार आहोत असेही उद्धव यांनी सांगितले आहे.

ANI ट्विट

दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या या विधानानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी भाष्य करत शिवसेनेवर टीका केली आहे. जेव्हा मुंबई वृक्ष प्राधिकरणाने या निर्णयाला समंती दिली आहे आणि महापालिका शिवसेनेच्या हातात आहे तेव्हा दोष शिवसेनेचाच आहे असेही निरुपम म्हणाले.