Aaditya Thackeray Kolhapur Visit : कोल्हापूरच्या दौर्यावर असलेले युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज एका अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. कोल्हापूरमध्ये (Kolhapur) शालेय विद्यार्थींना स्वरक्षणाचे धडे देण्याच्या एका कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. मात्र अचानक वार्याचा वेग वाढला आणि मंडपाचे काही थांब कोसळले, मंडप उडाला. परंतू व्यासपीठावरील सारेच उपस्थित सुरक्षित असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
कोल्हापूरच्या शिवशाहू महाविद्यालयात 2 हजार विद्यार्थिनींना स्वरक्षणाचे धडे देण्यासाठी खास शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. आदित्य ठाकरे शिबिरामध्ये धडे देताना अचानक आलेल्या वार्यामुळे मंडप उडाला मात्र आदित्य ठाकरेंनी सारा प्रकार सावरत या विषयी मिश्किल अंदाजात टिप्पणी करताना हा मंडप मीच जादूने वर नेला,मला तुमची रिअॅक्शन पहायची होती असं म्हटलं.
आज युवासेना कोल्हापूर दौऱ्याच्यानिमित्ताने शिवशाहू महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी आयोजित स्वसंरक्षण शिबिरात विद्यार्थिनींचा सहभाग लक्षणीय होता. त्यांच्यातील आत्मविश्वास आणि चमक बघून मी भारावून गेलो. Self Defence चे हे ट्रेनिंग त्यांच्यातला हाच आत्मविश्वास दृढ करण्यासाठी आहे. pic.twitter.com/pikr43G1sq
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 19, 2018
अचानक उडालेला मंडप पाहून उपस्थित विद्यार्थिनी घाबरल्या होत्या. मात्र स्थानिकांनी आणि आयोजकांनी हा प्रकार सावरून घेतला. व्यासपीठावरील सारे सुरक्षित असून या कार्यक्रमानंतर आदित्य ठाकरे त्यांच्या पुढील कार्यक्रमाला रवाना झाले आहेत.