Happy Birthday Aaditya Thackeray: ठाकरे कुटुंबातील प्रथम आमदार, पर्यावरण आणि पर्यटन मंत्री, मुंबई उपनगराचे पालकमंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा आज 13 जून रोजी वाढदिवस आहे. कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर यंदा आपल्या वाढदिवशी कुठेही पोस्टरबाजी करू नये उलट हितचिंतकांनी आणि शुभेच्छकांनी कोरोनामुळे अडचणीत असलेल्या कोणाला किंवा मुख्यमंत्री सहायता निधीत (CM relief Fund) आपले योगदान द्यावे असे आवाहन आदित्य यांनी केले होते. तुम्ही जाणूनच असाल की कोरोना सारख्या महामारी मध्ये वारंवार शांतता निर्माण करण्यासाठी, नागरिकांना धीर देण्यासाठी आदित्य काम करत आहेत. आज त्यांच्या वाढदिवशी राजकारणाच्या शिवाय आदित्य यांची काव्यलेखनची आवड ते फोटोग्राफी पर्यंत काही माहित नसलेले पैलू आपण जाणून घेणार आहोत चला तर मग पाहुयात आपण राजकारणाच्या पलीकडे आदित्य ठाकरे हे नाव काय आहे?
आदित्य ठाकरे यांचा काव्यसंग्रह
आदित्य ठाकरे यांनी वयाच्या 16 व्या वर्षी My Thoughts In Black & White हा काव्यसंग्रह लिहिला होता. मराठी, हिंदी, इंग्रजी कविता एकत्रित करून हा संग्रह प्रकाशित करण्यात आला होता. यामध्ये मुख्यतः शेतकरी आत्महत्या, राजकारण, स्वातंत्र्य, ब्रिटिश राज या विषयांवर कविता होत्या. यातील पहिली कविता त्यांनी नववीत असताना लिहिली असल्याचे सांगितले होते.
आदित्य ठाकरे यांचा युट्युब व्हिडीओ
आदित्य ठाकरे यांनी स्वलिखित कवितेचे सादरीकरण करणाऱ्या एक युट्युब व्हिडीओ मध्ये सुद्धा परफॉर्म केले आहे. हलके हलके नामक या व्हिडीओ मध्ये आदित्य यांचा न पाहिलेला अंदाज बघायला मिळत आहे.
आदित्य ठाकरे फोटोग्राफी
आदित्य ठाकरे यांना वडील उद्धव ठाकरे यांच्या सारखाच फोटोग्राफीचा सुद्धा छंद आहे. सोशल मीडिया अकाउंट वरून अनेकदा आदित्य यांनी आपण क्लिक केलेले फोटो शेअर केले आहेत.
View this post on Instagram
With such architecture around, does one need a filter at all? #Mumbai #BMC
आदित्य ठाकरे आणि फुटबॉल
\
View this post on Instagram
आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री आहेत पण त्यापूर्वीपासूनच अनेक प्रसंगी त्यांनी आपले निसर्ग प्रेम दाखवून दिले आहे. रस्त्यांची स्वच्छता असो किंवा बीच क्लिनिंग सेशन अनेक ठिकाणी आदित्य ठाकरे यांना आवर्जून पाहायला मिळाले आहे.
View this post on Instagram
आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या सेंट झेव्हिअर्स कॉलेज मधून BA History ची पदवी प्राप्त केली आहे. यानंतर के सी कॉलेज मधून त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे.