Aadesh Bandekar | (Photo Credits: Facebook)

कलाकारांच्या नावाचा वापर करून चाहत्यांची फसवणूक करण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. यामध्ये आता महाराष्ट्राचे लाडके भाऊजी बांदेकर भाऊजी अर्थात आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांच्या नावाचा देखील समावेश झाला आहे. आदेश बांदेकर यांच्या नावाचा गैरवापर करत काही जण सामान्यांची फसवणूक करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. बांदेकरांनीही या घटनेची दखल घेत सोशल मीडीयात चाहत्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी खास पोस्ट केली आहे.

आदेश बांदेकरांनी लिहलेल्या पोस्ट मध्ये त्यांनी “बांदेकर हे आडनाव किंवा या आडनावाशी साधर्म्य साधणारे बरेचजण मनोरंजनाबरोबर विविध क्षेत्रात वावरत आहेत. यापैकी कोणाशीही व्यवहार करताना काळजी घ्यावी. माझे नातेवाईक आहे असं सांगून कोणी आपली फसवणूक केल्यास त्याच्याशी माझा कोणताही संबंध नसेल,” असं म्हटलं आहे. नक्की वाचा: Shark Tank च्या Ashneer Grover ने केली फसवणूक? BharatPe मधून काढले जाण्याची शक्यता .

आदेश बांदेकर पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Aadesh Bandekar (@aadesh_bandekar)

आदेश बांदेकर हे 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करत आहेत. त्यानिमित्त महाराष्ट्रभर ते फिरले आहेत. कलाकार असण्यासोबतच ते श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष आहेत. त्यांना राज्य सरकारकडून राज्य मंत्री पदाच्या दर्जाचे स्थान बहाल करण्यात आले आहे. शिवसेनेमध्ये आदेश बांदेकर सक्रिय आहेत.