Pune Murder: पिंपरी-चिंचवडच्या चिखली परिसरात दिवसाढवळ्या एका तरूणाची धारदार शस्त्राने हत्या
Representational Image | (Photo Credits: PTI)

पुण्यातील (Pune) पिंपरी-चिंचवडच्या (Pimpri-Chinchwad) परिसरात दिवसाढवळ्या एका तरूणीची धारधार शस्त्राने हत्या (Murder) करण्यात आली आहे. ही घटना रविवारी घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पूर्ववैमन्यस्यातून ही हत्या करण्यात आल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अधिक तपास करत आहेत.

कानिफनाथ क्षीरसागर असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर, आकाश उर्फ मकसुद विजय जाधव असे आरोपीचे नाव आहे. कानिफनाथ आणि आकाश हे दोघे काही दिवसांपूर्वी ऐकमेकांच्या शेजारी राहत होती. त्यावेळी परिसरातील काही लोकांनी आकाशला बेदम मारहाण केली होती. या घटनेनंतर आकाशने दुसऱ्या ठिकाणी राहायला गेला. यामागे कनिफनाथ आहे, असा संशय आकाशला होता. तसेच आपल्याला मारहाण झाली आणि घर बदलावे लागले याचाही राग आकाशच्या मनात होता. याच रागातून आकाशने रविवारी भररस्त्यात कनिफनाथ याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हे देखील वाचा- Pune: पुण्यात एकच खळबळ! कुख्यात गुंड पप्पू वाडेकर आणि अक्षय किरतकिर्वे यांची एकाच दिवशी हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पुढील दोन दिवसात आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. जुन्या वादातून मृत व्यक्तीची हत्या केल्याचे आरोपीने कबूल केले आहे.