कोरोना विषाणूचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळून आले आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज 2 हजार 560 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 122 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 74 हजार 860 वर पोहचली आहे. यापैकी 32 हजार 329 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात चौथ्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. तसेच लॉकडाउनचा पाचवा टप्पा 30 जूनपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. सध्या भारतात एकूण 2 लाख 7 हजार 615 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 5 हजार 815 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 303 जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे देखील वाचा- धारावीतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1849 वर पोहोचली; आज 19 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
एएनआयचे ट्वीट-
2560 more #COVID19 cases & 122 deaths reported in Maharashtra today. The total number of cases in the state is now at 74860, including 2587 deaths. 32329 patients recovered so far: State Health Department pic.twitter.com/ev4weK99uW
— ANI (@ANI) June 3, 2020
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूमुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहे. मात्र, अद्यापही कोरोना विषाणूबाबत सकारात्मक बदल दिसून न आल्याने नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. देशात कोरोनाबाधितांसह कोरोनामुक्त होणाऱ्या संख्येतही वाढ होत आहे. यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.