पुण्यात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्याची दगडाने ठेचून हत्या
Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

पुण्याच्या (Pune) सूस खिंडी परिसरात एका विद्यार्थ्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. हा विद्यार्थी पुण्यात पीएचडी (PHD) करत होता. सुदर्शन ऊर्फ बाल्या बाबुराव पंडित असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो 30 वर्षांचा आहे. हा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याने पुणे पोलिसांनी (Pune Police) अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ABP माझा ने दिलेल्या वृत्तानुसार, चतुःश्रुंगी परिसरातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (NCL) हा विद्यार्थी पीएचडीचे शिक्षण घेत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, सुदर्शनची गळा चिरून आणि त्याचा चेहरा दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह सूस खिंडीत टाकण्यात आला. याबाबत सुदर्शनचा चुलत भाऊ संदीप यांनी चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञाताविरोधात खुनासह पुरावा नष्ट करणे व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हेदेखील वाचा- Nanded Bus Conductor Suicide: कंडक्टरने बेल वाजवण्याच्या दोरीने बसमध्येचं गळफास घेऊन केली आत्महत्या; नांदेड आगारातील धक्कादायक घटना

घटनास्थळी सुदर्शन च्या खिशात त्याचे पाकिट सापडले त्यावरून त्याची ओळख पडली. सुदर्शनच्या हत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही. पुणे पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.

सुदर्शन हा मूळचा जालना जिल्ह्यातील आहे. तो पाषाण परिसरातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) येथे रसायनशास्त्र विषयात पीएचडी करत होता. पीएचडीसाठी तो दीड वर्षांपूर्वी पुण्यात आला होता. सुतारवाडी भागात पेईंग गेस्ट म्हणून राहत होता.

दरम्यान पुण्यात (Pune) अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या (Suicide) केली आहे. नाना हंडाळ, (Nana Handal) असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. हंडाळ यांच्या आत्महत्येनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. नाना हंडाळ हे पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात काम करत होते.