Western Expressway Highway Accident (Photo Credit - ANI)

मुंबईतील पश्चिम दृतगती महामार्गावर (Western Expressway Highway) एका भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने ऑटो व टॅक्सीला धडक दिली. या जोरदार धडकेमुळे ट्रक उड्डाणपुलावरुन (flyover) खाली पडला. या अपघातात (Accident) टॅक्सीतील 4 प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना विलेपार्ले परिसरात (Vile Parle Area) घडली. अद्याप या अपघाताचे कारण समजू शकलेले नाही. यापूर्वीही या महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत.

हेही वाचा - मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर आता 120 KMPH वर चालवा गाडी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ठरावाला मंजुरी

भरधाव वेगामुळे अपघातात वाढ ?

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर चारचाकी वाहनाच्या चालकांना ताशी 120 किमीच्या वेगाने गाडी चालवण्यास परवानगी देण्याचा ठराव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केला होता. याआधी अनेक वर्ष हा वेग ताशी 80 किमी इतकाच मर्यादित ठेवण्यात आला होता. मागील काही दिवसांपासून रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत एक समिती या महामार्ग व एक्सप्रेसवेवरील वाहनांच्या वेगाचे परीक्षण करत होती. त्यानुसार यातील निरीक्षणानंतर आता हा वेगवाढीला परवानगी देणारा निर्णय घेण्यात आला आहे. चारचाकी वाहनांच्या भरधाव वेगामुळेदेखील अपघातात वाढ होण्याची शक्यता आहे.