Public Toilet Collapsed in Kurla: मुंबईतील कुर्ला भागात सार्वजनिक शौचालय (Public Toilet) कोसळले असून आत एक महिला अडकल्याची भीती वर्तवण्यात येत होती. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या टीमने बचावकार्य चालू केले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी शौचालयाजवळ गर्दी केली होती. शौचालयाचं छत कोसळल्याने संबंधित परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
सार्वजनिक शौचालयात अडकलेल्या महिलेची अग्निशमन दलाच्या जवानाकडून सुटका करण्यात आली आहे. या महिलेवर प्रथमोपचार करून तिला रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. मात्र उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा - Martyr Sangram Patil Funeral in Nigwe,Kolhapur: शहीद संग्राम पाटील यांचे पार्थिव कोल्हापरमध्ये दाखल, निगवे गावात होणार अंत्यसंस्कार)
एएनआय ट्विट -
Maharashtra: A public toilet collapsed in Kurla area of Mumbai, one woman reportedly trapped inside. Fire brigade team present at the spot, rescue operation is underway. More details awaited.
— ANI (@ANI) November 23, 2020
दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नानंतर शौचालयात अडकलेल्या महिलेची सुटका करण्यात आली. परंतु, दुर्दैवाने यात या महिलेचा मृत्यू झाला. आज सकाळी कुर्ल्यातील सार्वजनिक शौचालयाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली होती. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मलब्याखाली अडकलेल्या महिलेला बाहेर काढले.