Jugaad Ambulance| Photo Credits: Twitter/ ANI

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे देशात अनेक मेट्रो शहरांमध्ये आरोग्याच्या दृष्टीने आणीबाणीची स्थिती मागील काही पूर्वी तयार झाली होती. आजही महाराष्ट्रात कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होत असली तरीही अनेक ठिकाणी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बेड्स मिळण्यासाठि मारामारी सुरू आहे. अशात पुण्यामधील स्थिती पाहून तेथील रिक्षा चालकांनी पुढे येत आता रूग्णसेवेचं व्रत घेतलं आहे. पुण्यात कोविड रूग्णांसाठी आता रिक्षाचं रूपांतर रूग्णवाहिकेत करून 'जुगाड अ‍ॅम्ब्युलंस' (Jugaad Ambulance) ही सेवा राबवली जात आहे. हा उपक्रम डॉ. केशव क्षीरसागर यांच्या नेतृत्त्वाखाली सुरू झाला आहे.

ANI ला डॉ. केशव क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये अजूनही रूग्णांना बेड मिळण्यासाठी त्रास होत आहे. त्यामुळे आता आम्ही 3 रिक्षा या ऑक्सिजन सपोर्ट असणार्‍या केल्या आहेत. रिक्षामधील ऑक्सिजन सिलेंडर हा 6-7 तास राहू शकतो. आम्ही काही हेल्पलाईन नंबर्स जारी केले आहेत. त्याच्या आधारे लोकं आम्हांला संपर्क करू शकतात. आम्ही रिक्षा चालकांना ऑक्सिजन कसा द्यायचा यासाठी ट्रेनिंग दिलं आहे. त्यामुळे ते देखील पूर्ण खबरदारी घेत हे काम करतात. आमच्यासोबत एक डॉक्टरांची टीम देखील असते. असे ते म्हणाले. Hospital Bed Availability Online: मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर मध्ये रूग्णालयांत COVID-19 Emergency वेळी उपलब्ध Vacant ICU, Oxygen Beds ची इथे पहा माहिती.

अशी आहे जुगाड अ‍ॅम्ब्युलन्स

दरम्यान नुकतचं पुण्यामध्ये मनपा कडून ऑनलाईन वर देण्यात आलेली माहिती आणि प्रत्यक्षातील परिस्थिती यामध्ये फरक असल्याचं निदर्शनास आल्यानंतर हाय कोर्टाकडूनही त्यांना खडे बोल सुनावण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यांत काल 7714 नवे कोरोना रूग्ण तर 142 मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.