Baby | Representational image (Photo Credits: pxhere)

Fetus Of Baby Girl Found In Plastic Bag: सायन (Sion) येथील नागरीक संचालित लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल (Lokmanya Tilak Municipal General LTMG) रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शुक्रवारी दुपारी रुग्णालयाच्या आवारात कचऱ्यात टाकलेल्या बाळाचा गर्भ (Fetus Of Baby) सापडला. रुग्णालयाचे अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत. दरम्यान, सायन रुग्णालयात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा गर्भ प्लास्टिकच्या पिशवीत (Plastic Bag) बांधून कचऱ्यात फेकण्यात आला होता. शुक्रवारी दुपारी स्वच्छता कर्मचारी कचरा काढत असताना त्यांना गर्भ आढळून आला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. आम्ही अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास सुरू आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा -Viral: बिहारच्या छपरा शहरात जन्माला आली 4 हात, 4 पाय आणि 2 ह्रदय असलेले बाळ, पाहा फोटो)

दरम्यान, केईएम रुग्णालयाने 2019 मध्ये अशीच एक घटना नोंदवली होती जिथे गर्भपात झालेला गर्भ मांजरीने अर्धा खाल्ला होता. यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.

दरम्यान, मे महिन्यात जॉर्जियामध्ये एका प्लास्टिकच्या पिशवीत नवजात जिवंत सापडल्यानंतर सुमारे चार वर्षांनंतर, मुलाच्या आईला अटक करण्यात आली होती. आईवर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. 6 जून 2019 च्या रात्री फोर्सिथ काउंटीमधील जंगली भागात ही मुलगी चांगल्या स्थितीत सापडली. एका स्थानिक कुटुंबाने गुड मॉर्निंग अमेरिका वृत्तसंस्थेला यासंदर्भात माहिती दिली होती.