Coronavirus: कोरोना व्हायरसपासून बचावासाठी खासदार अमोल कोल्हे यांनी सुचवला SUMAN M नावाचा अनोखा फॉर्म्युला

जगभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) व्हायरस धुमाकूळ घालत असून आतापर्यंत महाराष्ट्रात 42 रुग्ण सापडले आहेत. यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या असून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी एक अनोखा उपाय सुचवला आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहे. खासदार अमोल कोल्हेंनी कोरोनापासून बचावासाठी व्हिडिओ शेअर करत एक खास आणि सोपी उपाय योजना सांगितली आहे. कोरोना व्हायरसच्या विळख्यात अकडकलेल्या मृतांची संख्या 7 हजारावर पोहचली आहे. तर, 2 लाख लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांनी स्वत: काळजी घ्यावी, असे आवाहन करणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

मुंबई: कोरोना व्हायरसने संपूर्ण जग हादरुन गेले आहे. जगातील बर्‍याच देशांमध्ये साथीच्या रोगासारखी स्थिती आहे आणि डब्ल्यूएचओने देखील भारतात एक साथीचा रोग जाहीर केला आहे. यापासून बचाव करण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. आता राजकीय नेते अमोल कोल्हे यांनीही नागरिकांना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. अमोल कोल्हे यांनी एका व्हिडिओ माध्यामातून लोकांना जागृत करण्याचे काम केले आहे. या व्हिडिओत कोल्हे म्हणाले की, धात धुण्याची अत्यंत सोपी आणि साधी पद्धत आहे. त्यासाठी ‘SUMAN M हे नाव लक्षात ठेवा. साबण लावून कमीत कमी 20 सेकंद हात धुतले पाहिजे. S– सरळ, U- उलट, M– मूठ, A- अंगठा, N– नखे आणि M म्हणजे मनगट’असे ते म्हणाले आहेत. तसेच हात धुवा, हात धुवा, हात धुवा… असे धुवा-तसे धुवा, हे ऐकून ऐकून कंटाळा आला असेल ना? ऐकण्याचा कंटाळा येऊ द्या. मात्र, हात धुण्याचा कंटाळा करु नका, असेही आवाहन त्यांनी केले आहे. हे देखील वाचा- Coronavirus: राज्यात नव्या 8 ठिकाणी COVID-19 तपासणी लॅब सुरु करणार, त्यातील 3 उद्यापासून कार्यरत होणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे

अमोल कोल्हे यांचा व्हिडिओ-

भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. म्हणून प्रत्येकाने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. भारतात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 153 पर्यंत पोहचली आहे. तर यामुळे मृत पावलेल्यांची संख्या 3 झाली आहे.