Maharashtra Health Minister Rajesh Tope (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संशयीत रुग्णांची तपासणी करण्यासाठी 8 नव्या ठिकाणी तपासणी लॅब राज्य सरकार सुरु करणार आहे. त्यातील 3 लॅब उद्यापासून सुरु होतील. केईएम, कस्तुरबा हॉस्पीटल आणि बी. जे. मेडीकल या ठिकाणी या 3 लॅब असतील. याशिवाय राज्यातील ग्रामीण भागातही आवश्यकता वाटल्यास तपासणी लॅब सुरु करण्याचा सरकारचा मानस असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली आहे. पुणे येथील NIV संस्थेला आरोग्यमंत्री टोपे यांनी आज भेट देऊन आढावा घेतला . त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बेडची संख्या वाढवली

राजेश टोपे यांनी या वेळी सांगितले की, राज्यभरात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 42 इतकी आहे. त्यातील सर्वांची प्रकृती स्थिर आहे. कोरना व्हायरस बाधित रुग्णांवर आणि संशयीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी नायडू रुग्णालयात 100, वायसीएम रुग्णालयात 60 नवे बेड उपलब्ध करुन दिले आहेत. (हेही वाचा, Coronavirus And Sex: संभोग केल्याने कोरोना व्हायरस होतो का? अनेकांना पडलाय प्रश्न, उत्तर काय?)

 वर्क फ्रॉम होम

राज्यातील खासगी कंपन्यांकडून वर्क फ्रॉम होम ही संकल्पना अधिक प्रभावी राबवावी यासाठी राज्य सरकार अधिक प्रयत्नशिल आहे. तसेच, सरकारी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांबातही वर्क फ्रॉम होम ही संकल्पना राबविण्यात येते का याचा विचार राज्य सरकार करत आहे. राज्य सरकारी कार्यालयात एकूण कर्मचाऱ्यांपैकी 50 टक्के कर्मचाऱ्यांवरच काम करता येतो का हेही पाहिले जाईल, असे राजेश टोपे यांनी या वेळी सांगितले.