Pune: महिलेकडून लैंगिक सुखाची मागणी केल्याप्रकरणी पुण्यातील आंबेगाव येथील IPS अधिकारी नीलेश अष्टेकर यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल
Molestation | (Photo Credits: Archived, edited)

Pune: पुण्यातील आंबेगाव (Ambegaon) येथील आयपीएस अधिकारी नीलेश अशोक अष्टेकर (IPS Officer Nilesh Ashtekar) यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील कळवा येथे राहणाऱ्या 31 वर्षीय विधवेकडे अष्टेकरने लैंगिक सुखाची मागणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, आयपीएस नीलेश अष्टेकर यांनी फेसबुक मेसेंजरवर महिलेला स्वत:ची पुण्यातील आयपीएस अधिकारी म्हणून ओळख असलेला मेसेज पाठवला आणि तिला पोलिस दलात सामील व्हायचे आहे का? अशी विचारणा केली. तेव्हा तिने सांगितले की, तिच्या बहिणीचा मुलगा पोलिस प्रवेश परीक्षेची तयारी करत आहे. मुंबई पोलिस भरती मोहिमेत तो नापास झाल्याचे तिने सांगितल्यावर अष्टेकरने तुमच्या बहिणीच्या मुलाला पोलिसात नोकरी मिळेल याची खात्री देतो, असे सांगून तिचा नंबर घेतला. बहिणीच्या मुलाला पोलिसात नोकरी लावायची असल्याने ती अष्टेकरच्या संपर्कात होती. (हेही वाचा -Pune: कोथरूडमध्ये DTH केबल फिक्स करणाऱ्या दोन जणांना हाय टेंशन वायरच्या संपर्कात आल्याने लागला विजेचा धक्का; एकाचा मृत्यू)

दरम्यान, अष्टेकर यांनी अनेकदा महिलेला व्हॉट्सअॅप मेसेज आणि फोन कॉलद्वारे अश्लील मेसेज पाठवून लैंगिक सुखाची मागणी केली. तसेच अश्लील व्हिडिओच्या लिंकही पाठवल्या. त्यानंतर अष्टेकरने महिलेला व्हॉट्सअॅपवर कॉल करून अश्लील भाषेत बोलण्यास सुरुवात केली. त्यांनी या महिलेला तिच्या बहिणीच्या मुलाला आपल्याकडे पाठवण्यास सांगितले. हा सर्व प्रकार पाहून महिलेने तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

दरम्यान, अष्टेकर हे त्यांच्या घरातून आणि कार्यालयातून तिच्याशी संवाद साधत होते, असं पीडितेने तक्रारीत नमूद केलं आहे. या तक्रारीवरून अष्टेकर यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक नारायण शिरगावकर पुढील तपास करीत आहेत.