Mumbai Crime: तरुणीचे खासगी फोटा व्हायरल केल्याने 41 वर्षीय व्यक्तीवर साकीनाका येथे गुन्हा दाखल
Digital Rape | (Photo credit: archived, edited, representative image)

Mumbai Crime: मुंबईत एका 22 वर्षीय तरुणीचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून तिच्यावर अनेकदा बलात्कार करणाऱ्या आरोपीविरुध्द साकीनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने आरोपीच्या मागण्यांना नकार दिल्यानंतर आरोपीने व्हिडिओतील काही आक्षेपार्ह प्रिंटआऊट काढून तीच्या सोसायटीत लावली. आरोपी आणि पीडित हे 2019 पासून एकमेकांच्या ओळखीचे होते. दोघेही रिलेशनशीपमध्ये होते.( हेही वाचा- कांदिवलीत शाळेच्या वॉचमनने केला 4 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार; आरोपीला अटक)

मिळालेल्या माहितीनुसार, गुरवैयै बुसिरासी असं आरोपीचे नाव आहे. तक्रारदार ही नवी मुंबई येथील रहिवासी आहे. 2019 फेब्रुवारी मध्ये पीडितेला लॉजमध्ये नेले आणि तिच्यावर जबरदस्ती करून व्हिडिओ शूट केला. त्यानंतर हे फुटेज व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला. तो पीडितेला अनेकदा धकम्याही देत होता. भेटण्यासाठी नकार दिल्यानंतर आरोपीने हद्दच पार केली. मुलीचे सर्व खासगी फोटोचे प्रिंटआऊट काढून सोसायटीत लावले. मुलीविषयी अश्लील गोष्टी लिहून बदनामी केली.

या घटनेनंतर पीडितेवर मानसिक दडपण आले, बदनामी झाल्याने ती घाबरली होती. या गोष्टीला कंटाळून तीनं पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 376, 376 (2)(एन), 384, 506 आणि 509अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना प्रथम साकीनाका येथे घडली असल्याने साकीनाका पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  पीडिता आणि आरोपी डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये काम करत होते जिथे दोघांची ओळख झाली.