School Watchman Rapes 4 Yr Old Student: लाजिरवाणे कृत्य! कांदिवलीत शाळेच्या वॉचमनने केला 4 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार; आरोपीला अटक
Girl | Representational image (Photo Credits: pxhere)

School Watchman Rapes 4 Yr Old Student: कांदिवली (Kandivli) पूर्व येथील अशोक नगर येथील शाळेतून अत्यंत धक्कादायक प्रकार समोर येत आहे. या शाळेतील चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी शाळेमध्ये काम करणाऱ्या वॉचमनला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीच्या आईने शुक्रवारी समता नगर पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी आरोपीला अटक केली.

वॉचमनने मुलीला दाखवले चॉकलेटचे आमिष -

वॉचमनने मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने वॉशरुममध्ये नेले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने तक्रारीत म्हटले आहे की, कांदिवली अशोक नगर येथील एका शाळेत शिकणारी 4 वर्षीय मुलगी नेहमीप्रमाणे तिच्या वडिलांसोबत शाळेत गेली होती. मात्र 2 फेब्रुवारीला शुक्रवार जेव्हा ती घरी परतली तेव्हा तिला तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना होऊ लागल्या. आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता बलात्काराची घटना उघडकीस आली. (हेही वाचा -UP Minor Girl Rape: 4 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार,फरार आरोपीचा पाठलाग करत गोळीबार; युपी हादरलं)

वॉचमनने मुलीशी गैरवर्तन केले. ज्यामुळे तिच्या खाजगी भागात संसर्ग झाला आणि जखमा झाल्या. डॉक्टरांनी मुलीची तपासणी करत हल्ल्याची पुष्टी केली. मुलीने वॉचमनने आपल्यावर गैरवर्तन केल्याचे सांगितले. त्यानंतर पीडितेच्या आईने आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला. त्यानंतर समता पोलिसांनी चौकीदाराला अटक केली.