UP Minor Girl Rape: उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगरमध्ये एका 4 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी आरोपीला अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फरार झालेल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलीसांनी पकडण्यासाठी पथक नेमलं होते. असगर असी असं आरोपीचे नाव असून पोलीसांच्या गोळीबारात जखमी झाला आहे. सद्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली आहे. (हेही वाचा-अल्पवयीन आरोपींकडून आठ वर्षांच्या मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, अधरिया गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. या घटनेनंतर आरोपी विरुध्दात पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. पोलिसांनी पथक तयार करून सोमलावारी मीरपूर भट्टाजवळ आरोपीला पाहिले, पोलिसांनी त्याला रोखण्याता प्रयत्न केला असताना, मात्र आरोपीने गोळीबार सुरु केला. पळतापळता गोळीबारात पोलिसांच्या टीम मधील एकाला गोळी लागली. त्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला या घटनेत आरोपीला गोळी लागली.
दिनांक 04.12.2023 को जनपद अम्बेडकरनगर को0 अकबरपुर पुलिस टीम द्वारा दिनांक 03.12.2023 को हुई नाबालिग बच्ची के साथ दुष्कर्म की घटना में संलिप्त अभियुक्त को पुलिस मुठभेड़ में किया गया गिरफ्तार।#UPPolice pic.twitter.com/sBKhIUY7Us
— AMBEDKARNAGAR POLICE (@ambedkarnagrpol) December 4, 2023
चौकशीत असगर अलीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातून ३१५ बोअरचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. जखमी आरोपी व पोलिसांना प्रथमोपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आंबेडकरनगर येथे पाठविण्यात आले व इतर कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.या घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली आहे.