Beed Minor Girl Rape Case: अल्पवयीन आरोपींकडून आठ वर्षांच्या मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार, बीड येथील धक्कादायक घटना
Rape case representaional photo

Beed Rape News: मुंबई एका शिक्षकाने 16 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याची घटना ताजी असताना महाराष्ट्रातील बीड (Beed) जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका आठ वर्षाच्या चिमुकलीवर तीन अल्पवयीन मुलांनी बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  ही घटना बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे. या प्रकरणी बीड पोलिसांनी अल्पवयीन आरोपांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने संपुर्ण बीड हादरले आहे. (हेही वाचा-16 वर्षीय मुलीचा खासगी क्लासेसच्या शिक्षकाकडून लैंगिक छळ, आरोपीला अटक

मिळालेल्या माहितीनुसार, 14 वर्षीय असलेल्या तिघा मुलांनी एका आठ वर्षीय मुलीवर सामुहिक अत्याचार केले. रविवारी सांयकाळी 6च्या सुमारास ही घटना समोर आली. एका हॉटेलच्या बाजूला असलेल्या पडक्या रुममध्ये मुलीला नेलं आणि तिथंच तिघांनी मुलीवर अत्याचार केला. पीडित चिमुकलीने आरडाओरड केल्याने एका व्यक्तीने घटनास्थळी धाव घेतला. मुलांकडून पीडित मुलीची सुटका केले आणि मदतीस आलेल्या व्यक्तीने तात्काळ मुलीच्या कुटुंबांकडे धाव घेतला,

या घटनेची माहिती कुटुंबियांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी तिन्ही आरोपी मुलांना अटक केल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.  तसेच, वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. या प्रकरणात पिंक पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक अतुलकुमार लांडगे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. विशेष म्हणजे, तिन्ही बालकांच्या पालकांना पोलिसांकडून नोटीस देण्यात आली आहे. या घटनेसंदर्भात मुलांच्या शाळेत देखील चौकशी करण्यात येणार आहे. सद्या मुलांना पालकांकडे सोपवण्यात आले आहे.