Buldhana Accident: बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डाजवळ ट्रक आणि कारचा अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू
Accident (PC - File Photo)

Buldhana Accident: बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा पोलिस स्टेशन हद्दीत लव्हाळा फाटा जवळील पावर हाऊससमोर ट्रक आणि कारच्या धडकेत भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर आणखी तीन जण गंभीर जखमेत आहेत. हा अपघात रात्रीच्या तीनच्या सुमारास झाला आहे. भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याची माहिती मिळाली. (हेही वाचा- लातूर मध्ये भरधाव गाडी घुसली थेट हॉटेलात; व्हिडीओ वायरल

मिळालेल्या माहितीनुसार, साखरखेर्डा येथे ट्रक आणि कारच्या धडकेत अपघात झाला आहे. हा ट्रक स्टेट बॅंकेचे लॉकर घेऊन धुळे येथून हैद्राबादकडे जात होता.  कार अवंढानागनाथ येथून दर्शनाहून बुलढाणा येथे परत निघाल्यावर जोरदार अपघात झाला. या धडकेत कारमधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. या घटनेची माहिती जवळच्या पोलिस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी अपघातग्रस्त ठिकाणी जाऊन जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारमधील वैभव रामकृष्ण लोखंडे याचा चिखली येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच सागर एकनाथ सुरुशे, आदित्या गजानन सुरुशे हे अपघातात जखमी झाले आहेत. यांच्यावर संभाजीनगर येथे उपचार सुरु आहेत. अविनाश पंजाब गव्हाणे याला किरकोळ जखमी झाला आहे.

पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. ट्रक चालक भरधाव वेगात वाहन चालवत असल्याची माहिती मिळत आहे. अपघातामुळे रस्त्यावर बराच वेळ वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. थोड्याच वेळाच पोलिसांनी वाहतुक सेवा सुरळीत केली. अपघातामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.