संतापजनक! डोंबिवलीत 9 वर्षीय चिमुरडीवर जन्मदात्या बापानेचं केला बलात्कार; पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर नराधम पित्याला अटक
Representational Image | (Photo Credits: File Photo)

उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये (Hathras Rape Case) झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघालं आहे. अशातचं देशाच्या तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातून बलात्काराच्या घटना उघडकीस येत आहेत. डोंबिवलीमध्ये (Dombivli) अतिशय संतापजनक घटना घडली आहे. जन्मदात्या बापाने आपल्या 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार (Rape) केला असून पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून नराधम पित्याला अटक करण्यात आले आहे. या घटनेमुळे डोंबिवली परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पीडितेची आई डोंबिवलीतील शेलारनाका परिसरात राहते. मात्र, ती काही कारणासाठी याच परिसरात राहणाऱ्या आपल्या आईकडे राहण्यास आली होती. दरम्यान, गुरुवारी दुपारी पीडित मुलगी खेळण्यासाठी आपल्या घरी गेली होती. यावेळी पीडितेचे वडील झोपेतून उठले आणि मुलीला एकट खेळताना पाहून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडितेने वडीलांच्या तावडीतून आपली सुटका केली आणि आजीच्या घरी आली. येथे आल्यानंतर पीडितेने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रसंग आईला सांगितला. (हेही वाचा - बलात्काराच्या घटनांमध्ये भारतातील 'हे' 10 राज्य आहेत अतिशय घातक; राजस्थानमध्ये सर्वाधिक भयानक परिस्थिती, तर महाराष्ट्रात 55 टक्क्यांनी वाढलेत बलात्कार प्रकरणं)

त्यानंतर पीडितेत्या आईने ताबडतोब रामनगर पोलिस ठाण्यात नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी पीडितेवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला अटक केली असून त्याच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शेलारनाका परिसरात परिसरात एकच खळबळ उडाली. (हेही वाचा - Hathras Case: 'बेटी बचाओ' चा नारा देणारे नरेंद्र मोदी हाथरस प्रकरणी मूग गिळून गप्प का? बाळासाहेब थोरात यांचा पंतप्रधानांना सवाल)

देशात गेल्या 10 वर्षांच्या तुलनेत बलात्काराच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. महाराष्ट्रात 55 टक्क्यांनी बलात्कार प्रकरणं वाढले आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीनुसार, 2012 मध्ये निर्भया सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर देशातील बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.