प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

पुण्यातील (Pune) खेड तहसीलमध्ये (Khed Tahsil) आज सायंकाळी पाचच्या सुमारास भिंत कोसळल्याने(Wall Collapse) एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच या महिलेच्या कुटुंबातील पाच सदस्य जखमी झाले आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (Pune Zilla Parishad CEO Ayush Prasad) यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

दरम्यान, आज कोकण किनारपट्टीपण धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाने एकाचा बळी घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये वीजेचा खांब कोसळून 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी भागात मोठं नुकसान झालं आहे. या चक्रीवादळाच्या तडाख्याने अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. (हेही वाचा - Cyclone Nisarga: रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे विजेचा खांब अंगावर कोसळल्याने 58 वर्षीय वक्तीचा मृत्यू)

निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा पुणे शहरालाही बसला आहे. निसर्ग वादळामुळे पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस पडून पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. पुण्यात या चक्रीवादळाचा वेग ताशी 60 ते 70 किमी असणार आहे. पुण्यात आज रात्री उशिरापर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. निसर्ग चक्रीवादळ पनवेल, कर्जत, खोपोली, नाशिक या दिशेने सरकत आहे.