धक्कादायक! नागपूरच्या कळमेश्वरभागात बालवाडीतून घरी येणाऱ्या 5 वर्ष मुलीचा दगडाने ठेचून खून
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

बालवाडीतून घरी येणाऱ्या 5 वर्ष बालिकेचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना नागपूरच्या (Nagpur) कळमेश्वरभागात (Kalameshwar) घडली आहे. निलम शांताराम धुर्वे (वय 5, रा. लिंगा, ता. कळमेश्वर) असं या लहान मुलीच नाव आहे. निलम शुक्रवारी लिंगा येथील बालवाडीत गेली होती. ती सायंकाळी घरी परत न आल्याने कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. परंतु, निलमाचा तपास लागला नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी कळमेश्वर पोलीस ठाण्यात निलम हरवल्याची तक्रार नोंदविली. (हेही वाचा - बलात्कार्‍यांना लवकर फाशी होत नसेल तर एन्काऊंटर योग्यच: समाजसेवक अण्णा हजारे)

दरम्यान, पोलिस तसेच गावातील काही तरुणांनी निलमचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर गावाजवळच्या संजय भारती (रा. नागपूर) यांच्या तुरीच्या शेतात निलमचा मृतदेह आढळून आला. यावेळी तिच्या डोक्यावर दगडाने वार केल्याच्या जखमा होत्या. निलमच्या अंगात असलेला टी शर्टचा काही भाग तिच्या तोंडात अडकलेला होता. (हेही वाचा- उन्नाव येथील दुष्कर्माविरोधात सफदरजंग रुग्णालयाबाहेर एका अंदोलनकर्त्या महिलेचा 6 वर्षीय चिमुकलीला जाळण्याचा प्रयत्न)

पोलिसांनी वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, निलमचा खून करण्यात आला आहे. नागपूर पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहे. हैदराबाद तसेच उन्नाव प्रकरणानंतर देशभरात भीतीदायक वातावरण तयार झाले.