बलात्कार्‍यांना लवकर फाशी होत नसेल तर एन्काऊंटर योग्यच: समाजसेवक अण्णा हजारे
Anna Hazare (Photo Credits: ANI)

देशात सध्या रोज बलात्कार, लैंगिक अत्याचाराच्या घटन समोर येत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी एका डॉक्टर महिलेवर बलात्कार करून तिला जीवंत जाळल्याची घटना समोर आली होती. या गुन्ह्यातील आरोपींना आरोपींचा हैदराबाद पोलिसांनी घटनास्थळीच एन्काऊंटर केला. समाजातील विविध स्तरांमध्ये हैदराबाद बलात्कार आरोपींच्या एन्काऊंटवर संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहे. मात्र आज (8 डिसेंबर) महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 'फास्ट ट्रॅक' कोर्टामध्ये खटला चालवूनही आरोपींना लवकर फाशी मिळत नसेल तर पोलिसांनी केलेले एन्काऊंटर योग्य असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. Hyderabad Encounter: स्वसंरक्षणातून एनकाऊंटर; सायबराबाद पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांची माहिती

 हैदराबादमध्ये आरोपी पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांच्यावर गोळीबार केला केला आणि चौघांचाही जागीच खात्मा केला. या घटनेनंतर काहींनी त्याचं समर्थन केलं तर काहींनी या घटनेचा निषेध केला आहे. मीडीयाशी बोलताना अण्णा हजारे म्हणाले बलात्कार्‍यांच्या एन्काऊंटर प्रकरणाला काही जर गुन्हा समजत असतील. मात्र अशा गुन्ह्यातील आरोपींना फाशी होत नसेल तर एन्काऊंटर करणे योग्य आहे. दिल्लीत काही वर्षांपूर्वी अशीच घटना घडली होती. मात्र त्यातील आरोपींना अद्याप फाशी झालेली नाही. त्यामुळे हैदराबादमध्ये पोलिसांनी जे केलं ते योग्यचं आहे असे ते म्हणाले. हैदराबाद, दिल्ली सारख्या बलात्काराच्या घटना देशाच्या इतर ठिकाणी देखील घडत आहेत. त्यामुळे अशा आरोपींना फाशी देण्याची गरज आहे. डॉ. आंबेडकरांनी जी घटना बनवली ती खूप चांगली आहे. मात्र आता आरोपींवर लवकर कारवाई व्हावी असे मत त्यांनी मांडले आहे.Hyderabad Rape and Murder Case:आरोपींच्या एन्काऊंटवर अभिनेते अनुपम खेर, ऋषी कपूर यांच्यासह 4 कलाकारांनी व्यक्त केल्या सोशल मीडीयावर आपल्या प्रतिक्रिया!

27 नोव्हेंबरच्या रात्री एका पशुवैद्यक तरूणीवर बलात्कार करून नंतर तिला जीवंत जाळण्यात आले होते. या घटनेतीक आरोपींना पोलिसांनी घटनास्थळी नेत पीडितेच्या वस्तू शोधण्यासाठी नेले असताना 6 डिसेंबरच्या पहाटे आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला आणि स्वसंरक्षणातून हैदराबाद पोलिसांनी चारही आरोपींचा एनकाऊंटर केला.