Drown | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

Pune News: पुण्यात (Pune) काल गणपती विसर्जन मोठ्या धुमधडाक्यात पार पडला आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड येथे एक दुर्घटना घडली आहे. अवघ्या चार वर्षाचा मुलाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवड मधील मोशी येथे गणपती विसर्जन सुरु असताना ही घटना घडली. अर्णव आशिष पाटील असं या मृत मुलाचे नाव आहे. काल संध्याकाली घटना घडली. पिपंरी चिंचवड येथील मोशीतील मंत्रा सोसायटी परिसरतील अर्णव हा रहिवाशी होता.

गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला होता. सोसायटीमधील गणपती विसर्जन टाकीच्या शेजारी उभा राहून कार्यक्रम पाहत होता. सर्व जण रहिवाशी नाचण्यात गुंग होते. अचानक अर्णव टाकीत पडला पण त्याला कोणीही पाहिले नाही. अर्णवने काही सोबत सेल्फी देखील काढले होते अन् ते शेवटचे ठरले. बऱ्याच तासानंतर कुटूबियांना समजले की, अर्णव टाकीत पडला आहे. त्याला बाहेर काढण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर अर्णवला मृत घोषित केले.

या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. पाटील यांच्या कुटूंबियांवर गणपती विसर्जना दरम्यान दुखाचा डोंगर कोसळला. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरु केली. पोलीसांनी सोसायटीच्या अध्यक्षांसोबत सोसायटीचा तपास केला.