प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) हाहाकार मजावला आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) महत्वाचा वाटा उचलत आहेत. मात्र, आपले कर्तव्य बजावत असताना अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. यातच ठाणे (Thane) जिल्ह्यात कार्यरत असलेल्या 45 वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या संकटात अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांमध्यो या विषाणूचा संसर्ग अधिक वेगाने होत असून राज्यात मोठ्या संख्येत पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे, कोरोनामुळे आज दिवसभरात तब्बल पाच पोलीस कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे पोलीस प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

एकाच दिवसात राज्यात आज पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोना विषाणूने बळी गेला. पुण्यात वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त सकाळी आले होते. त्यानंतर पुणे येथील वाहतूक विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यू माहिती सायंकाळी आली होती. यातच ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एका 45 वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती एएनआय वृत्त संस्थेने दिली आहे. हे देखील वाचा- Coronavirus Update In Maharashtra Today: महाराष्ट्रात 41 हजार 642 कोरोनाबाधित; राज्यात आज 2,345 नव्या रुग्णांची नोंद तर, 64 जणांचा मृत्यू

एएनआयचे ट्वीट- 

महाराष्ट्रात आतापर्यंत मोठ्या संख्येत पोलीस कर्मचारी कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. मागील दोन महिन्यांपासून भारतामध्ये कोरोना व्हायरस लॉकडाऊन आहे. नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलिस कर्मचारी अहोरात्र मेहनत करत आहेत. अशामध्ये बंदोबस्ताच्या ड्युटीपासून क्वारंटीन सेंटर ते नाक्यानाक्यावर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या विळख्यात आता पोलिस कर्मचारी देखील आले आहेत