महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशात कोरोना विषाणूने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून योग्य ते निर्णय घेतले जात आहेत. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यात आज 2 हजार 345 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 64 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 41 हजार 642 वर पोहचली आहे. यापैकी 1 हजार 454 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 11 हजार 726 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात चौथ्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. तसेच लॉकडाउनचा चौथा टप्पा 31 मेपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. सध्या भारतात एकूण 1 लाख 12 हजार 359 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 3 हजार 435 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 45 हजार 300 जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे देखील वाचा- मुंबई: धारावीत आणखी 47 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 1425 वर पोहचला
एएनआयचे ट्वीट-
2,345 new #COVID19 cases & 64 deaths reported in Maharashtra today. Total number of cases in the state is now at 41,642 and death toll stands at 1454: State Health Department
— ANI (@ANI) May 21, 2020
चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण भारताला हादरून सोडले आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ पाहता प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे बोलले जात आहे.