Coronavirus: मुंबईमध्ये (Mumbai) 40 वर्षीय कोरोनाग्रस्त महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा 7 वर पोहचला आहे. शनिवारी या रुग्णाला श्वसनाचा तसेच उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज राज्यात कोरोनाचे 7 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी मुंबई 4, पुणे 2 आणि सांगली, नागपूर, येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 193 वर पोहचली आहे. (हेही वाचा - Coronavirus in Maharashtra: मुंबई, पुणे, सांगली, नागपूर येथील 7 नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 193)
A 40-year old #Coronavirus patient has passed away in Mumbai, she was admitted yesterday following severe respiratory complications and was also a hypertension patient. This is the seventh corona virus-related death in Maharashtra
— ANI (@ANI) March 29, 2020
विषेश म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. परंतु, दिलासादायक बाब म्हणजे यातील अनेक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यातील आणखी पाच जणांना आज डिस्चार्ज देण्यात येणार आहे.