पालघर: डहाणू मधील 39 वर्षीय परिचारिकेला कोरोना व्हायरसची लागण
Image For Representation (Photo Credits: IANS)

पालघर (Palghar) जिल्ह्यातील डहाणू (Dahanu) तालुक्यामधील वाकी ब्राम्हणपाडा येथे राहणाऱ्या एका 39 वर्षीय परिचारिकेला (Nurse) कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाली आहे. ही महिला बृहन्मुंबई महानगरपालिका रुग्णालयात (Mumbai Municipal Hospital) परिचारिका म्हणून कार्यरत आहे. राज्यात कोरोना व्हायरसचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. कोरोना रुग्णांची देखभाल करणाऱ्या राज्यातील अनेक वैद्यकिय कर्माचाऱ्यांना कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे.

यापूर्वीदेखील पालघरमध्ये मधील एका नर्सला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. ही महिला पालघरच्या पूर्व भागातली रहिवासी होती. ही परिचारिका मुंबई च्या के. ई. एम रुग्णालयात (KEM Hospital) नर्स म्हणून कार्यरत होती. मागील महिन्यात मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये तब्बल 21 कर्मचाऱ्यांना तर वॉकहार्ट हॉस्पिटलमधील 26 नर्स आणि 3 डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. (हेही वाचा - Coronavirus:औरंगाबाद जिल्ह्यात आज 51 नव्या कोरोना रुग्णांची भर, तर घाटी रुग्णालयात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू)

कोरोना विरोधातील लढाई लढताना देशातील अनेक वैद्यकिय कर्माचाऱ्यांना तसेच पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. परंतु, कोणतीही भीती न बाळगता सर्व कोरोना यौद्धे आपले कर्तव्य अतिशय चांगल्या पद्धतीने बजावत आहेत. त्यांच्या या कार्याचे जगभरात कौतुक होत आहे. तसेच सरकारनेदेखील कोरोना यौद्ध्यांचे आभार मानले आहे.

महाराष्ट्रात सोमवारी 2 हजार 33 नव्या रुग्णांची भर पडली. तर, 51 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 35 हजार 58 वर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यात 1 हजार 249 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तसेच 8 हजार 437 जणांनी कोरोनावर मात केली आहे.